ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - अनेक राज्यांमध्ये छोटे विमानतळ उपलब्ध आहेत. पण त्यांचा वापर अजिबातच होत नाही, किंवा नगण्य वापर होतो. असे विमानतळ वापरात आणण्याचा निर्णय पर्यटनाला आणि पायाभूत सुविधांच्या जाळ्याला बळकटी देईल. नव्या २० विमानतळांच्या निर्मिती खेरीज अस्तित्वात असलेल्या १६० विमानतळांचा वापर यातून सुरू होणे शक्य आहे. त्यासाठी राज्यांची मदत घेतली जाणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळांची संख्या वाढली की त्याचा तीर्थक्षेत्र विकासालाही पर्यटनाच्या अंगाने हातभार लागू शकतो.