Airtel भारतात 5G सेवेचा झपाट्याने विस्तार करत आहे. याअंतर्गत एअरटेलनेचीनला लागून असलेल्या सीमा भागात 5G कनेक्टिव्हिटी देण्यास सुरुवात केली आहे. Airtel ने लडाख केंद्रशासित प्रदेशात 5G नेटवर्क सुरू केले आहे. आता लडाखमधील लोकांनाही एअरटेल 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे. पण, यामुळे चीनला मिरची लागणार आहे.
लडाखसारख्या सीमावर्ती भागात 5G सेवा सुरू केल्याने केवळ लडाखच नव्हे तर संपूर्ण भारताची कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. यासोबतच युद्धाच्या परिस्थितीतही चांगल्या संपर्कासाठी याचा फायदा होईल. विशेष म्हणजे, एअरटेल यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेणार नाही. सीमावर्ती भागातील नागरिक अगदी मोफत हाय स्पीड 5G सेवेचा आनंद घेऊ शकतील.
Airtel 5G सेवेचा आनंद घेण्यासाठी ग्राहकाकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही राहता त्या भागात 5G कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. एअरटेल थँक अॅपवरुन याचा आनंद घेता येईल. Airtel 5G सेवेसाठी फोनचे रिचार्ज किमान 239 रुपये असावे. विशेष म्हणजे, 5G सेवेसाठी ग्राहकाला नवीन सिम कार्डची गरज भासणार नाही. कंपनीचा दावा आहे की, एअरटेल 5G नेटवर्कला 4G पेक्षा 20 ते 30 टक्के वेगवान स्पीड मिळेल. एअरटेलमध्ये अलीकडे अनलिमिटेड डेटा दिला जात आहे.