शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा

By admin | Published: April 16, 2017 6:56 PM

रिलायन्स जिओनं बाजारात उडी घेतल्यापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - रिलायन्स जिओनं बाजारात उडी घेतल्यापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे. ग्राहकांनी कोट्यवधींचा टप्पा पार केल्यानंतर जिओनं मोफत सेवा बंद करून प्राइम मेंबरशिप घेण्याची ऑफर आणली. त्यालाही ग्राहकांनी ब-यापैकी प्रतिसाद दिला. त्यानंतर जिओने समर सरप्राइज ऑफर बंद करून धन धना धन ही ऑफर ग्राहकांसाठी सेवेत आणली. त्याच पार्श्वभूमीवर एअरटेलनं ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी 3 महिन्यांकरिता 4जी स्पीड 30 जीबी फ्री डेटा देणार असल्याची घोषणा केली आहे. एअरटेल 3 महिन्यांसाठी स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांना 4जी स्पीडयुक्त 30 जीबी डेटा मोफत देणार आहे. मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एअरटेल अ‍ॅपवर लॉगिन करावं लागणार असून, 30 एप्रिलपर्यंतच तुम्ही ही ऑफर मिळवू शकता. एअरटेल प्रवक्ते म्हणाले, गेल्या महिन्यात 10 जीबी डेटाचा फायदा घेणारे ग्राहकही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी ग्राहकांना एक ईमेलही पाठवला आहे. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत मोफत डेटाचा लाभ घ्या, ही ऑफर तुमच्या लांब सुट्ट्यीच्या काळातही सुरू राहील, असं गोपाल विठ्ठल यांनी ईमेलमध्ये लिहिलं आहे. यासोबत जे ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग पॅक सक्रिय करू शकले नाहीत, त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. तत्पूर्वी रिलायन्स जिओच्या दोन्ही ऑफर्स एकसमानच असल्यामुळे धन धना धन ही ऑफर बंद करावी, अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली होती. रिलायन्सच्या या ऑफरमुळे टेलिकॉम कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे एअरटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते. टेलिकॉम कंपन्यांची स्थिती अत्यंत दयनीय असल्यानं इतर स्पर्धकांना या प्रमाणे ऑफर देणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले होते. रिलायन्सने जिओ प्राइम मेंबरशिपसोबत दिलेली तीन महिन्यांची दिलेली मोफत सेवा बंद करावी, असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रूपात पुन्हा जुनीच ऑफर ग्राहकांसाठी सेवेत आणली होती. या नव्या ऑफरचे नाव जिओ धन धना धन आहे. जिओ समर सरप्राइज ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा या ऑफरमध्ये मिळणार आहेत. जिओच्या नव्या ऑफरद्वारे तुम्हाला तीन महिन्यांसाठी मोफत डेटासोबतच फ्री एसएमएस सेवा, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे