शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

एअरटेलची 'सरप्राइज ऑफर', 30 जीबीपर्यंत मिळवा मोफत डेटा

By admin | Published: March 14, 2017 2:37 PM

भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही बाजारात नव्या ऑफर आणल्या आहेत. भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली असून, प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. माय एअरटेल अ‍ॅपच्या माध्यमातून हा डेटा मिळवता येणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी हा मोफत डेटा माय एअरटेल अ‍ॅपवर उपलब्ध असून, त्यासाठी ग्राहकांना अ‍ॅपमधील claim free data यावर क्लिक करावे लागणार आहे, अशी माहिती इकोनॉमिक्स टाइम्सनं दिली आहे. एअरटेल हे भारतातील सर्वात जलद नेटवर्क आहे. आमच्या नेटवर्कचा स्पीड जगभरात सर्वात जलद असल्याचा किताब आम्हाला ओकोला या स्पीड टेस्ट कंपनीनं दिला आहे. ग्राहकांशिवाय आमचा आनंद हा अपुरा असून, त्यासाठी आम्ही आमच्या पोस्टपेड ग्राहकांचे आभार मानतो, असं एअरटेलतर्फे पोस्टपेड ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या इमेलमध्ये कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले आहेत.(एअरटेलची 'सरप्राइज' ऑफर, 13 मार्चपासून इंटरनेट फ्री)(व्होडाफोनची 4 जी ग्राहकांना बंपर ऑफर)(एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)(एअरटेल धमाका: 345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)एअरटेलनं याआधीही दोन प्लॅन लाँच केले होते. पहिला 145 रुपयांचा, तर दुसरा 345 रुपयांचा प्लॅन आहे. एअरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये एअरटेल कॉलिंग आणि रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग मोफत आहे. तसेच या प्लॅनमध्ये 2 जीबीचा इंटरनेट डेटाही मिळणार आहे. ज्याची वैधता 28 दिवसांपर्यंत मर्यादित असेल. तर 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 जीबी इंटरनेट डेटा मिळणार असून, देशभरात कुठेही मोफत कॉलिंग करता येणार आहे. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी 500 एमबीपर्यंत डेटा उपलब्ध असून, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत 500 एमबीचा अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. याची वैधताही 28 दिवसांची असणार आहे.