नवी दिल्ली : पनामा पेपर्समध्ये बिग बी अमिताभ बच्चन व ऐश्वर्या बच्चन यांची नावे येताच बॉलीवूडला हादरा बसला. आता अजय देवगणचीही त्यात भर पडली आहे. अजयने ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील मॅरीलीबोन एन्टरटेन्मेंट या कंपनीचे एक हजार शेअर्स खरेदी केल्याचे वृत्त आहे.या कंपनीची एजंट म्हणून मोसॅक फोनेस्का ही पनामाची कायदा कंपनी काम पाहते. न्यसा युग एन्टरटेन्मेंट या कंपनीत अजयची अभिनेत्री पत्नी काजोलही सहमालक असून या कंपनीने हे शेअर्स खरेदी केले. २०१३ मध्ये या कंपनीचे संचालकपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच वर्षी अजयने या कंपनीचा राजीनामा दिला होता. काही विदेशी कंपन्यासंबंधी मंडळाच्या बैठकीचा भाग म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांच्या नावाचा पनामा पेपर्सने केलेला उल्लेख फुटल्यामुळे त्याबाबत वाद छेडला गेला होता. माझ्या नावाचा उल्लेख झालेल्या कोणत्याही कंपनीची मला माहिती नाही, असे सांगत बच्चन यांनी गुंतवणूक केल्याचा इन्कार केला होता. (वृत्तसंस्था)विदेशातील प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार या कंपनीची स्थापना करण्यात आली असून माझ्या कुटुंबाने आयकर विवरणात कायद्यानुसार त्याबाबत माहिती दिली आहे.- अजय देवगण, अभिनेता
पनामा पेपर्समध्ये अभिनेता अजय देवगणचे नाव
By admin | Published: May 05, 2016 3:03 AM