ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी अजय मित्तल यांनी विजय दर्डा यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच उद्योग क्षेत्रातील अडीअडचणींवर त्यांच्यात चर्चा झाली. या भेटीविषयी बोलताना दर्डा यांनी मित्तल यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, उद्योग क्षेत्रातील अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या मित्तल यांच्या शैलीनं मी प्रभावित झालो. माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील कोणत्याही विषयाकडे पाहण्याची मित्तल यांची दृष्टी अलौकिक असून, कठीण प्रसंगातही ते योग्य निर्णय घेतात, असेही दर्डा म्हणाले. माध्यमातील जाहिरातींच्या दर सुधारणेच्या विषयात लक्ष घालण्याची विनंती विजय दर्डा यांनी मित्तल यांना केली आहे. उभयतांमध्ये वृत्तपत्रांच्या वेतन आयोग मुद्द्यावरही चर्चा झाली. या भेटीत माहिती आणि प्रसारण मंत्रालय करीत असलेल्या सुधारणांविषयी मित्तल यांनी दर्डा यांना माहिती दिली. प्रकाशकांच्या देयक प्रणालीतही पारदर्शकता आणण्याचा विचार मित्तल यांनी व्यक्त केला. सचिव या नात्यानं उद्योग क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करणं हे माझं कर्तव्य असल्याचं यावेळी अजय मित्तल यांनी दर्डा यांच्याकडे स्पष्ट केले.
माहिती आणि प्रसारण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणार- अजय मित्तल
By admin | Published: October 03, 2016 11:44 PM