Ajit Doval ( Marathi News ) : देशात 'एनडीए'ला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांच्यासह ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या दोन्ही पदांवरील सेवा विस्तारास मान्यता दिली आहे. आता अजित डोवाल पुढील ५ वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर राहणार आहेत.
अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजित डोभाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इटलीला जाणार आहेत. येथे ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होतील.
काल कुवेतमध्ये लागलेल्या आगीत ४२ भारतीयांच्या मृत्यूबाबतही पीएम मोदींनी आढावा घेतला. या बैठकीला अजित डोवालही उपस्थित होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची १० जून २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील आदेशापर्यंत कायम राहील. मोदी सरकारच्या काळात अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जा मिळला आहे. अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत आणि गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम खूप कौतुकास्पद आहे.
२०१४ पासून अजित डोभाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
२०१४ मध्येच ते पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम सुरू केले आहे. भारताच्या सुरक्षा धोरणावर अजित डोवाल यांची छाप दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानप्रेरित दहशतवाद आणि देशात आणि परदेशात खलिस्तानच्या उदयाला तोंड देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारताच्या अरब देशांसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी डोवाल हे देखील जबाबदार मानले जातात. मोदी सरकारच्या काळात भारताने पाकिस्तानबाबत कडक धोरण अवलंबले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने हल्ला केला. याशिवाय पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने आक्रमक कारवाई केली.