कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केले. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जोडी थॉमस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. काही दिवसांपूर्वी झालेल्या या संभाषणात डोवाल यांनी खलिस्तानी फुटीरतावादी, अतिरेकी आणि दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळत असल्याचा मुद्दा थॉमस यांच्यासोबत उपस्थित केला होता, असं सांगण्यात येत आहे. कॅनडात आश्रय घेत असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांबद्दल त्यांनी आपल्या कॅनडियन समकक्षांना सांगितले आणि त्यांची यादीही सुपूर्द केली.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI'ने हरदीपसिंहची हत्या केली; धक्कादायक माहिती समोर
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी जोडी थॉमससोबत वॉन्टेड गुन्हेगारांची माहिती आणि ठिकाणेही शेअर केली. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार भारतीय समकक्ष अजित डोवाल यांना केला. एनएसए डोवाल यांनी जोडीला कॅनडाच्या बेतुका आरोपांचे पुरावे मागितले, पण कॅनडाचे एनएसए पुरावे देऊ शकले नाहीत. अजित डोवाल यांनी जोडी थॉमस यांना सांगितले की, कॅनडाने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे आणि इनपुट दिल्यास भारत तपास करण्यास तयार आहे.
कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांनी गेल्या महिन्यात दोनदा भारत भेट दिल्याचे एक दिवसापूर्वी उघड झाले होते. दोन्ही वेळा त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन खलिस्तानी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा दावा केला जात आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार या वर्षी ऑगस्टमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान भारतात आले होते. दोन्ही वेळा अजित डोवाल यांच्याशी त्यांची भेट झाली.
अहवालानुसार, अजित डोवाल यांच्या भेटीदरम्यान जोडी थॉमस यांनी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या कथित सहभागाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि तपासात सहकार्य मागितले होते. त्यानंतर भारतीय एनएसएने त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्याची मागणी केली होती, पण कॅनडा अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकलेली नाही.