रायपूर : श्वासनलिकेमध्ये चिंचोका अडकल्याने अत्यवस्थ झालेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज निधन झाले. त्यांना ९ मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते ७४ वर्षांचे होते.
सकाळी अजित जोगी नाश्ता करत होते, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांना त्यांच्या श्वासनलिकेमध्ये चिंचोका अडकल्याचे आढळले होते. अजित जोगी यांच्यावर शस्त्रक्रिया करून हा चिंचोका बाहेर काढण्यात आला होता. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज दुपारी ३.३० च्या सुमारास त्याचे पूत्र अमित जोगी यांनी त्यांच्या निधनाचे ट्विट केले. ''केवळ मीच नाही तर छत्तीसगडने बाप गमावला. गोरेला येथील गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.''
अजित जोगी कोण होते?अजित जोगी हे भारतीय प्रशासकीय सेवेतून राजकारणात आले होते. सध्या ते मारवाही मतदारसंघातून आमदार आहेत. २००० मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती होताच ते पहिले मुख्यमंत्री बनले होते. २००३ मध्ये निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा पराभव केल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली होती. नंतर २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेसशी फारकत घेत नवीन पक्ष स्थापन केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात
Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?
अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार