शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
2
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
3
Ganesh Visarjan 2024 Live: किनाऱ्यावर भाविकांची गर्दी; 'लालबागचा राजा'चं समुद्राकडे मार्गक्रमण
4
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
5
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
6
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
7
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
9
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
10
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
11
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
12
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
13
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
14
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
15
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
16
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
18
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
19
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
20
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप

अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; शरद पवार गटाकडून कॅव्हिएट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 6:17 AM

राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगाकडे

- सुनिल चावकेनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे तसेच सुमारे ४० आमदार, खासदारांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र असलेली याचिका बुधवारी अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली. शरद पवार गटाकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल करण्यात आले आहे.

१९६८ च्या निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ अंतर्गत अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला सुमारे ४० खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्यांची प्रतिज्ञापत्र असलेली  ३० जून २०२३ तारखेची याचिका तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याच्या तारीख नसलेल्या प्रस्तावाची प्रतही ५ जुलैला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या इशारापत्राचा (कॅव्हिएट) ई-मेल ३ जुलैला आयोगाला प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीच्या विधानसभेतील ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सक्षम प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आल्याची सूचना देणारे जयंत पाटील यांचे ३ जुलैचे पत्रही आयोगाला प्राप्त झाले. निवडणूक आयोगाकडून याविषयी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यात येईल, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले. 

शरद पवार गटाची आज दिल्लीत बैठकशरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथे गुरुवारी बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्ह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात शरद पवार आणि अजित पवार गटाने एकमेकांवर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या दिल्लीतील केनिंग्ज लेन येथील कार्यालयाऐवजी ही बैठक दुपारी ३ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य या बैठकीत सहभागी होतील. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस