आम्हाला तीन राज्यांत मान्यता मिळाली आहे. आता आम्हाला हे इथेच थांबवायचे नाहीय पुढे न्यायचे आहे. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून सक्षम आणि यशस्वी बनविण्यासाठी पहिला टप्पा दिल्ली निवडणूक असणार आहे.
विरेंद्रसिंग यांच्या नेतृत्वात आम्ही पक्ष वाढवू, दिल्लीत आम्ही जरूर खाते उघडणार आणि यशस्वी होणार असा मला कार्यकर्त्यांचा विश्वास पाहून वाटत असल्याचे पटेल म्हणाले. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम्ही जो गमावलेला तो लवकरात लवकर मिळवून दाखवू असे पटेल म्हणाले.
तीन राज्यांत म्हणजेच महाराष्ट्रासह नागालँड, झारखंडमध्ये राष्ट्रवादीला मान्यता मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली होती. ती पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. एनडीएमध्ये असल्याने भाजपाच्या साथीने अजित पवार राष्ट्रवादी पक्ष दिल्लीत जागा लढविणार की स्वतंत्र लढविणार हे अद्याप समजू शकलेले नाही.
महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीला किती मतदान...
अजित पवारांची राष्ट्रवादी ५८.१ लाख मते घेऊन ४१ जागा जिंकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी ७२.८ लाख मते मिळवत १० जागाच जिंकू शकली आहे. या दोन्ही गटात ३९ जागांवर थेट लढत झाली. यापैकी अजित पवारांच्या पक्षाने ३३ जागा जिंकल्या आहेत. लोकसभेला अजित पवार गटाला २०.५ लाख मते तर शरद पवार गटाला ५८.५ लाख मते मिळाली होती.