राजस्थानच्या बोरखेडा परिसरात राहणारा 24 वर्षीय यशराज साहू हा अशा तरुणांसाठी एक उदाहरण आहे ज्यांना आयुष्यात नवीन कल्पना घेऊन पुढे जायचे आहे. तसेच यशाचा नवा मार्ग शोधायचा आहे. बीएससी एग्रीकल्चरमध्ये ग्रॅज्युएट झालेला यशराज साहू तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे आणि शेतकर्यांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्याची यशोगाथा जाणून घेऊया...
यशराजने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. त्याने कृषी शास्त्रात पदवी घेतली असल्याने त्यांचा कल शेतीशी संबंधित कामाकडे होता. अशा परिस्थितीत त्याने अभ्यासादरम्यान कोटा येथील कृषी विज्ञान केंद्रात मशरूमच्या बिया तयार करण्याची पद्धत शिकून घेतली आणि अभ्यास पूर्ण केल्यानंतर घरीच मशरूमच्या बिया तयार करण्यास सुरुवात केली. आता हे बियाणे विकून त्याला वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे
24 वर्षीय यशराज साहूने सांगितलं की, 2021 मध्ये अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने त्यांच्या घरी मशरूमच्या बिया बनवण्यासाठी लॅब सुरू केली. ही लॅब उभारण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च करण्यात आले. लॅब सुरू केल्यानंतर त्याने मशरूमच्या बिया तयार करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना 80 ते 100 रुपये किलो दराने बियाणे विकतो. पहिल्या वर्षी त्याला सुमारे सहा लाख रुपयांचा नफा झाला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी 12 लाख रुपये कमावले. विविध राज्यातील लोक त्याच्याकडे येतात आणि बिया घेतात.
यशराज साहूने सांगितले की, मशरूमची लागवड 20 बाय 20 खोलीतही करता येते. दुसरीकडे, मशरूमची लागवड केली, तर खूप चांगला नफा मिळू शकतो. तसेच कोटा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना मशरूम लागवड आणि बियाणे तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"