शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

"पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल...!"; अजमेर दर्गा वादावरून ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 5:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, मोदी आणि आरएसएस यांची राजवट देशातील बंधुता आणि कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे.

राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भातील वादात आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, ही भाजप आणि आरएसएसच्या द्वेषपूर्ण राजकारणाची नवी खेळी असल्याचे खासदार ओवेसी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, 'तुम्ही सगळीकडे जाऊन म्हणाल की, मशीद अथवा दर्ग्याच्या जागेवर काहीतरी वेगळे होते. पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल की, इथे असे काही नव्हते. हे कुठे थांबणार? कायद्याच्या राज्याचे काय होणार? लोकशाही कुठे जाणार? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. ते 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, मोदी आणि आरएसएस यांची राजवट देशातील बंधुता आणि कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते पुढे म्हणाले, 'त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला (या प्रकरणात) पक्षकार बनवले आहे. मोदी सरकार त्यांना काय सांगणार? कनिष्ठ न्यायालये प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी का करत नाहीत?

'नेहरूंपासून मोदींपर्यंत अजमेर दर्ग्याला चादर पाठवत आले आहेत' -ओवेसी म्हणाले, "दर्गा गेल्या 800 वर्षांपासून आहे. नेहरूंपासून ते सर्व पंतप्रधान दर्ग्याला चादर पाठवत आले आहेत. भाजप-आरएसएसने मशिदी आणि दर्ग्यांसंदर्भात एवढा द्वेष का पसरवला आहे? पीएम मोदीही तिथे चादर पाठवतात. कनिष्ठ न्यायालये प्लेस ऑफ वर्शिप अॅक्टवर  सुनावणी का करत नाहीत. अशा प्रकारे कायद्याचे राज्य आणि लोकशाही कुठे जाणार? हे देशाच्या हिताचे नाही. हे सर्व भाजप आणि आरएसएसच्या निर्देशाने होत आहे."

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMuslimमुस्लीमMosqueमशिदTempleमंदिर