प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आकांक्षा चौरसिया हिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यूपी पोलिसात ASI पदासाठी निवड झाली आहे. आकांक्षाने आपल्या यशाचे सर्व श्रेय पालकांना दिले आहे. आकांक्षाच्या यशाने संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांनी तिच्या आई-वडिलांचे खूप अभिनंदन केले. तिचे यश पाहून गावातील मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
अमृतपाली भागात राहणारे रामकिशून चौरसिया यांची एकुलती एक मुलगी आकांक्षा चौरसिया हिची ASI म्हणून निवड झाल्याने गाव आणि जिल्ह्याचे नाव मोठं झालं आहे. आकांक्षाची आई मनोरमा देवी शिवणकाम करते आणि तिचे वडील सेल्समनचं काम करतात. आकांक्षाने तिची संपूर्ण तयारी शहरातील द्वारकापुरी कॉलनीतील जिनियस कोचिंगमधून केली.
आकांक्षा म्हणाली की, कधी कधी मी एकांतात बसून रडायची की कदाचित मलाही भाऊ असता तर माझ्या वडिलांना इतके कष्ट करावे लागले नसते. मुलीच्या यशानंतर वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी तरळले. वडील म्हणाले की हे अश्रू आनंदाचे आहेत. अशी मुलगी देव प्रत्येकाला देवो. मला मुलगा नाही, पण या मुलीने ती उणीव जाणवू दिली नाही. आकांक्षाच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, तिने बलिया येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
एएसआय झालेल्या आकांक्षाने सांगितले की, तिच्यासाठी अभ्यास करणे आणि यश मिळवणे हे मोठं काम होतं. ती सहा ते सात तास अभ्यास करायची. आकांक्षाने आपल्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि तिचे संपूर्ण कुटुंब आणि शिक्षकांना दिले. तिच्या यशानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.