Akasa Air flight bomb Threat : गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता आज दिल्लीहूनमुंबईला जाणाऱ्या Akasa Air च्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्तामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यानंतर पायलटने तात्काळ विमानाची अहमदाबादमध्ये ईमर्जन्सी लँडिंग केली. विशेष म्हणजे, यावेळी विमानात 186 प्रवाशांसह 6 क्रू मेंबर्स होते.
आकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले की, 03 जून 2024 रोजी दिल्लीहूनमुंबईला उड्डाण केलेल्या फ्लाइट QP 1719 मध्ये बॉम्ब असल्याचा अलर्ट आला. यानंतर विमान अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले. पायलटने सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियेचे पालन केल्यानंतर सकाळी 10:13 वाजता विमानाची सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग झाली आणि सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. विमान लँड झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने विमानाची सखोल तपासणी केली, पण सुदैवाने त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्बदरम्यान, रविवार(दि.2) फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचे वृत्त समोर आले होते. यासंदर्भातील पत्र मिळाल्यामुळे क्रु-मेंबर्स आणि 306 प्रवाशांमध्ये प्रचंड खबराट पसरली. यानंतर तात्काळ विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सुदैवाने त्या विमानातदेखील कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
यापूर्वी मिळालेल्या अशा धमक्यायापूर्वी चेन्नईहून मुंबई आणि दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानांमध्येही बॉम्ब असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बॉम्बच्या धमक्या मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही.