काही दिवसापूर्वी एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती, आता आज आणखी एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. हे विमान अकासा एअरच्या QP 1335 हे आहे. विमान बंगळुरुला निघाले होते. धमकी मिळाल्यानंतर विमान दिल्लीला परतले. विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
विमानात 174 प्रवासी होते. फ्लाइटमध्ये तीन मुले आणि सात क्रू मेंबर्स होते. दिल्लीत सुरक्षित लँडिंगसाठी सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचे पालन केले आहे.
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?
देशातील सात विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. ही धमकी सोशल मीडिया साइट एक्सच्या माध्यमातून मिळाली आहे. मात्र, ही धमकी खोटी निघाली. या विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा एक्स हँडलने केला होता. याआधी सोमवारी तीन आंतरराष्ट्रीय विमानांनाही बॉम्बची धमकी देण्यात आली होती.
इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांना धोका निर्माण झाला होतासोमवारी मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
या विमानांना मिळाली होती धमकी
जयपूर ते बंगळुरू एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX765)
स्पाईसजेट फ्लाइट (SG116) दरभंगा ते मुंबई.
अकासा एअर फ्लाइट बागडोगरा ते बेंगळुरू (QP 1373)
इंडिगो फ्लाइट दम्मम (सौदी अरेबिया) ते लखनौ (6E 98)
अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट (9I 650)
मदुराई ते सिंगापूर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX 684)