ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतीय जनतेशी संवाद साधतात. आजही मोंदी यांनी संवाद साधला. मोदींच्या याच कार्यक्रमावरुन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला रोज नविन वळण मिळतं आहे. अखिलेश यादव यांनी रॅलीला संबोधत असताना मोदी यांनी मन की बात न करता काम की बात करावी असे म्हणत टीका केली, ते म्हणाले, जे लोक मन की बातकरतात, ते स्वप्नांच्या दुनियेत राहतात. मात्र, वास्तव काही वेगळेच असते. जे लोक मन की बात करतात, त्यांनी उत्तर प्रदेशात काम की बात करायला हवी, असा टोला अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. तर खासदार डिंपल यादव म्हणाल्या मोदी तीन वर्षापासून मन की बात करत जनतेशी संवाद साधत आहेत, तीन वर्षात 400 रुपये किंमतीच्या गॅस सिलेंडरची किंमत 700 झाली तेव्हा ते काय करत आहे याचे भान त्यांना आहे का? पुढे बोलताना त्या म्हणाल्या जे लोक गेल्या तीन वर्षांपासून मन की बात करत आहेत त्यांच्या मनात काय आहे याचा विचार आपण केला का. त्यांच्या मनात आहे भेदभाव, त्यांच्या मनात आहे स्मशान आणि दफनभूमी त्यांच्या मनात आहे दिवाळी आणि रमजान असे म्हणत डिंपल यादव यांनी मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. डिंपल यादव यांनी अनेक गोष्टींवरुन केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार झाला. उत्तरप्रेदश मधिल महाराजगंजमधील सभेत अमित शाह यांनी काँग्रेस-सपाच्या युतीवर तोंडसुख घेताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 104 उपग्रह सोडण्याचे काम केले, राहुल गांधी पंक्चर झालेल्या सायकलला धक्का देण्याचे काम करत आहेत.
अखिलेश-डिंपलने 'मन की बात' करत मोदींवर केली टीका
By admin | Published: February 26, 2017 6:16 PM