ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 16 - उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना समाजवादी पक्षात मात्र यादवी माजली आहे. सपा नेते मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलहामुळे राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. काका - पुतण्याच्या संघर्षामुळे राजकीय संकट उभं राहण्याची शक्यता असताना मुलायमसिंह यादव मात्र सर्व काही आलबेल आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिलेश माझ्या शब्दाबाहेर नाही, तो माझं म्हणण कधीच टाळणार नाही असं मुलायमसिंह यादव बोलले आहेत. अखिलेश आज संध्याकाळी शिवपाल यादव यांची भेट घेणार आहेत असंही मुलायमसिंह यादव यांनी सांगितलं आहे.
मी असेपर्यंत समाजवादी पक्षात फूट पडू शकणार नाही. अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यात कोणतेही वाद नाहीत असा दावा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केला आहे. महत्त्वाची मंत्रिपदे काढून घेतल्याने नाराज झालेले शिवपाल यादव यांनी गुरुवारी रात्री मंत्रिपदाच्या राजीनाम्याबरोबरच उत्तर प्रदेश समाजवादी पक्ष प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा मुलायम सिंहांनी स्वीकारला नाही.
मुलायमसिंहांचे चुलतभाऊ रामगोपाल आणि अखिलेश यादव हे एका बाजूला आणि मुलायमसिंह आणि शिवपाल हे दुसऱ्या बाजूला असा संघर्ष आहे.
WATCH-"Ram Gopal ko bahar karo" slogans raisd during Shivpal Yadav's address to supporters outside Lucknow residence pic.twitter.com/SYTieuuDrP— ANI UP (@ANINewsUP) September 16, 2016
पहाटे शिवपाल यादव यांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली होता. शिवपाल यादव यांनी समर्थकांशी संपर्क साधत आम्ही सर्व मुलायम सिंग यादव यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांचा संदेश आमच्यासाठी आदेश असतो असं सांगतिलं. समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली करत यादव कुटुंबातील पक्षाचे महत्वाचे सदस्य रामगोपाल यांना हटवण्याची मागणी केली.
Shivpal Yadav addresses his supporters outside his residence in Lucknow (UP) pic.twitter.com/RVk3TmA9Iq— ANI UP (@ANINewsUP) September 16, 2016