लखनौ : समाजवादी पाटीर्चे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवीमुळे पक्षात सुरू झालेला सत्तासंघर्ष संपला नसला तरी, त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले. कौटुंबिक कलहातून अखिलेश यांचे नेतृत्व तावून सुलाखून निघत असल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणामध्ये सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात अखिलेश यादव आणि त्यांचे काका तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्या लोकप्रियतेविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या उत्तरातून अखिलेश यांना अधिक लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून आले. सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत ७७.१ टक्के लोकांनी अखिलेश यांना पहिली पसंती दर्शवली होती. मात्र आॅक्टोबर महिन्यात सपातील तसेच यादव कुटुंबातील भांडणे वाढत गेल्यानंतर त्यांची अखिलेश यांची लोकप्रियता ८३.१ टक्के इतकी झालीमुख्यमंत्री म्हणून सप्टेंबरमध्ये अखिलेश यादव यांना ६६.५ टक्के लोकांनी पसंती दिली होती. मात्र आॅक्टोबरमध्ये ७५.७ टक्के लोकांनी अखिलेश यादल हेच मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्तम आहेत, असे सांगितले. अखिलेश यांचे वडील व समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांना सप्टेंबर महिन्यात १९. १ मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. आॅक्टोबरमध्ये केवळ १४.९ टक्के लोकांनीच मुलायमसिंग यादव हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरू शकतात, असे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)१२,२२१ लोकांचे मतउत्तर प्रदेशच्या ४0१ विधानसभा मतदारसंघांमधील १२ हजार २२१ लोकांचे मत या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आले होते. अर्थात या सर्वेक्षणातील बहुतांशी प्रश्न समाजवादी पक्ष, मुलायमसिंग यादव व अखिलेश यांच्याविषयीचे होते. त्यात अन्य पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची लोकप्रियता यांचा उल्लेख नव्हता.
नेताजींपेक्षा अखिलेशच लोकप्रिय
By admin | Published: October 29, 2016 2:20 AM