शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
3
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
4
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
5
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
6
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
7
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
8
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
9
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
10
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
11
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
12
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
13
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
14
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
15
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
16
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
17
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
18
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
19
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
20
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले

अखिलेशने जिंकली सायकलची शर्यत

By admin | Published: January 16, 2017 6:49 PM

समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता-पुत्रातील राजकिय दंगल अखिलेश यादव यांनी जिंकली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - उत्तरप्रदेश मधील राजकिय दंगल ने आता नवे वळण घेतले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव या पिता-पुत्रांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली राजकिय दंगल अखिलेश यादव यांनी जिंकली आहे.  आज  निवडणुक आयोगाने पक्षाच्या नावासह सायकलचे चिन्हंही अखिलेश यादव यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे मुलायम सिंग यांना मोठ्ठा धक्का बसला आहे. 
 
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं आज आपला आदेश जाहीर केला. समाजवादी पार्टीच्या तब्बल 200 आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना होता.
 
 वर्षाच्या सुरुवातालीच समाजवादी पक्षातील राजकीय दंगल समोर आली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव, पक्षाचे राज्यसभेतील खासदार राम गोपाल यादव विरुद्ध पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, त्यांचे बंधू शिवपाल सिंह यादव आणि अमर सिंह यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दोन्ही बाजूंनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केल्याने हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. आज निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिल्याने अखिलेश यांनी राजकीय दंगलीत बाजी मारली.
 
 
90 टक्के आमदारांचा अखिलेश यादव यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा समाजवादी पक्ष म्हणून विचार करण्यात यावा असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितल्याचे राम गोपाल यादव यांनी सांगितले होते. राम गोपाल अखिलेश यांचे काका असून, सपामध्ये यादवी सुरु झाल्यापासून ते अखिलेश यांच्यासोबत आहेत.