लखनौ - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तर केंद्रात सत्ताधारी असलेला भाजपा पिछाडीवर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ''जेव्हा एक आणि एक मिळून 11 होतात, तेव्हा भल्या भल्यांची सत्ता नौ दो ग्यारह होते,'' असे ट्विट करून अखिलेश यादव यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे संकेत दिले आहेत. पाच राज्यातील कल समोर आल्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात "जेव्हा एक आणि एक मिळून 11 होतात, तेव्हा भल्या भल्यांना सत्तेतून खाली यावे लागते,'' दरम्यान, सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनेसुद्धा विरोधी पक्षांच्या एकजुटीचे समर्थन केले होते. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी अंतिम निकालाबाबत अद्याप स्पष्टपणे भाष्य करणे घाईचे ठरेल. मात्र काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ मिळाले आहे.
एकजूट होते तेव्हा भल्या भल्यांची सत्ता जाते, पिछाडीवर पडलेल्या भाजपाला अखिलेश यादव यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:32 AM