रायबरेली : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झालि नसली तरी सर्वच राजकीय पक्ष जोरात प्रचाराला लागले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभा व मेळाव्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. भाजपसाठी योगींपासून सारे नेते प्रचारात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उत्तर प्रदेशात जात आहेत. अशा गरमागरम वातावरणात शनिवारी सपाच्या नेत्यांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे पडताच अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाच चढवला.
भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे. या यंत्रणांनाच भाजपने जणू निवडणुकीत उतरवले आहे. प्राप्तीकर खात्याने (आयटी) छापे घातले. आता अजून ईडी, सीबीआय यांचे छापे पडणेही बाकी आहे, अशी उपरोधिक टीका अखिलेश यादव यांनी केली. पण अशा छाप्यांना आम्ही घाबरत नाही. पायाखालील वाळू सरकत असल्यानेच भाजपने हे सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. अखिलेश यादव सध्या समाजवादी विजय यात्रेच्या आयोजनाच्या तयारीत आहेत.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय, अखिलेश यादव यांचे खासगी सचिव जैनेंद्र यादव तसेच आरसीएल ग्रुपचे मालक मनोज यादव यांची निवासस्थाने, कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या. राजीव राय हे यादव यांचे निकटवर्तीय राजीव राय हे अखिलेश यांचे निकटवर्तीय असून,. २०१२मध्ये सपाचे सरकार आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. राय यांच्या कर्नाटकमध्ये शिक्षणसंस्था आहेत. (वृत्तसंस्था)
मिश्रांवर कारवाई का नाही?
- भाजपने कितीही आकाशपाताळ राज्यात समाजवादी पक्षाचेच सरकार येणार आहे.
- आमच्या पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत, असे सांगून अखिलेश यादव यांनी सवाल केला की, लखीमपूर खीरीमध्ये वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले.
- तपास यंत्रणांनी अहवाल सादर करूनही केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रांवर कारवाई का होत नाही?