ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात सुरू असलेल्या संघर्षातील पहिल्या डावात अखिलेश यादव वरचढ असल्याचे दिसत आहे. ठरल्याप्रमाणे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश या दोघांनी आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली. त्यानुसार अखिलेश यांच्या बैठकीत 198 आमदार आणि 25 मंत्री उपस्थित असून मुलायमसिंह यांच्या बैठकीत आतापर्यंत केवळ 11 आमदार आणि 67 उमेदवार हजर असल्याची माहिती आहे.
समाजवादी पक्षाचे एकूण 229 आमदार आहेत, यातील अर्ध्याहून अधिक आमदार अखिलेश यांच्या बैठकीत सहभागी झाले आहेत, त्यामुळे अखिलेश यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यांनी बैठकीत उपस्थित राहणा-या आमदारांना मोबाइल आणण्यास परवानगी दिली आहे. शिवाय, त्यांनी सांगितल्याशिवाय कुणीही बैठक सोडून जाणार नाही, असे निर्देशही दिले. जेणेकरुन अखिलेश यांच्या बैठकीत सहभागी झालेले आमदार मुलायमसिंह यांच्या बैठकीसाठी हजर राहू शकणार नाही, असा सरळ हेतू या रणनीतीमागे असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत रामगोपाल यादवदेखील सहभागी झाले होते.
मुलायमसिंह यांच्या बैठकीत केवळ 14 आमदार
दरम्यान, मुलायम सिंह यांच्या बैठकीत केवळ 14 आमदारच सहभागी झाले. त्यांनी जे उमेदवार घोषित केले त्यातील केवळ 67 जणच मुलायमसिंह यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर होते.
अखिलेश यादव यांनी सोपवली 207 आमदारांची यादी
दरम्यान समर्थकांसोबत झालेल्या बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी अबू आझमी, आझम खान यांच्यासह वडील मुलायमसिंह यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी 207 आमदारांची यादी मुलायम सिंह यांच्याकडे सोपवली.
Unke (Mulayam Singh) saath sab dalal jama ho gaye hain, sab galat rai de rahe hain: Abu Azmi, SP pic.twitter.com/UU85KSNGs5— ANI UP (@ANINewsUP) 31 December 2016
CM Akhilesh Yadav left his MLA meeting midway to meet Mulayam Singh Yadav. Both Shivpal and Ramgopal Yadav not present— ANI UP (@ANINewsUP) 31 December 2016