शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:22 AM

आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

आझमगढ : आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ समाजवादी पक्षाच्या म्हणजे यादवांच्या मतांमध्ये फूट पाडतील, असा भाजपचा आडाखा आहे. बिगरयादव ओबोसी, दलित आणि सवर्ण गट भाजपसोबत राहतील, त्यामुळे वेगळे चित्र निर्माण होईल, अशी भाजपला आशा आहे. इथे १९ लाख मतदारांपैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक यादव, तीन लाखांपेक्षा अधिक मुस्लिम व तेवढेच दलित आहेत. ती मते अखिलेश यांनाच मिळतील, असे चित्र आहे.आझमगढ हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. प्रधानमंत्री मोदी यांची लोकप्रियता आणि अभिनेता म्हणून आपले वलय याद्वारे आपण अखिलेश यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे, असा निरहुआ यांचा दावा आहे. पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केल्याने आझमगढ मधून निवडणूक लढवित आहोत, असे अखिलेश यांचे म्हणणे आहे.अखिलेश म्हणाले की, उत्तर प्रदेशातील सर्व ८० मतदारसंघांमध्ये मी प्रचारासाठी फिरलो. आझमगढचा विचार करता नेताजी, मुलायमसिंग यादव येथे आहेत आणि ते जनतेशी जोडले गेलेले आहे. ते खासदार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना सर्वांगिण विकासाची खात्री दिली होती. ज्या पूर्वांचल एक्सप्रेस वेविषयी भाजप आज बोलत आहे, ती योजना माझी आहे. या मतदारसंघात मी भरपूर योजना आणल्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019azamgarh-pcआझमगढ