लखनौ : समाजवादी पक्ष, यादव कुटुंब यांच्याबद्दल राज्यात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेल्या गेल्या काही दिवसांतील पक्षातील घडामोडींनंतर पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी चिरंजीव अखिलेश यादव यांच्या पुढाकाराने निघालेल्या रथयात्रेला येथे हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शिवपाल यादवही उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भवितव्याला अडचणींत आणणाऱ्या घटनांनंतर मुलायम सिंह यादव यांनी पक्षात ऐक्य असल्याचे दाखवायचा प्रयत्न याद्वारे केला. मात्र नेते मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याच्या आधी समाजवादी पक्षातील दोन गटांत काही काळ बाचाबाची व मारामारी झाली. पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना शांत केले.अखिलेश यादव यांचे आगमन होताच मुलायमसिंह यादव यांनी रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. काही क्षणांतच शिवपाल यादवही तेथे पोहोचले.‘‘अखिलेश को हम शुभकामनाएँ देते है,’’ असे शिवपाल यादव म्हणाले. ‘विकास से विजय की ओर यात्रा’ हा संदेश राज्यभर ऐक्याचा संदेश देईल व भाजपला रोखेल. आमचे लक्ष्य भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे आहे, असे शिवपाल म्हणाले.यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी गेल्या चार वर्षांतील विकास कामांचा उल्लेख भाषणात केला. (वृत्तसंस्था)>रथ सुरू झाला अन् बिघडलाअत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असा हा रथ अवघ्या एक किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बिघडला. त्यामुळे अखिलेश यादव यांना त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या वाहनातून पुढे प्रवास सुरू करावा लागला.
अखिलेशच्या यात्रेला नेताजी, शिवपालही
By admin | Published: November 04, 2016 6:20 AM