अकलूजची लावणी हैदराबादमध्ये सादर होणार
By admin | Published: June 26, 2015 1:26 AM
अकलूज - येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत व्यावसायिक गटातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्वाती ज्योती पुरंदावडेकर, मंगेश कला मंच, अकलूज यांना हैदराबादच्या तेलुगू ई.टी.व्ही. चॅनलवर महाराष्ट्राची लावणी सादर करण्याची संधी मिळाली आहे.
अकलूज - येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत व्यावसायिक गटातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्वाती ज्योती पुरंदावडेकर, मंगेश कला मंच, अकलूज यांना हैदराबादच्या तेलुगू ई.टी.व्ही. चॅनलवर महाराष्ट्राची लावणी सादर करण्याची संधी मिळाली आहे.गुरुवारी बारा कलाकारांचा संघ हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या रामोजी स्टुडिओ येथे चित्रीकरणासाठी रवाना झाला. ई.टी.व्ही. तेलुगू चॅनलवर विविध प्रांतातील वैशिष्ट्यपूर्ण लोककला सादर करून देशभक्तीचा एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमामधून दिला जाणार असल्याचे या चॅनेलचे संचालक राज साळुंखे यांनी सांगितले.या कलाकारांना जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या संघाचे प्रमुख अंजीर साळोखे यांनी जयसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार केला. प्रमुख कलाकार स्वाती व ज्योती पुरंदावडेकर यांनी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सादर करण्याचा विश्वास व्यक्त केला. या पार्टीला गणेश कला, क्रीडा मंचच्या वतीने पुणे येथे गणेश फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केले गेले आहे. त्याचप्रमाणे शासकीय लावणी स्पर्धेच्या कार्यक्रमातदेखील त्यांना संधी मिळणार आहे. याप्रसंगी समितीचे सचिव सुभाष दळवी, संचालक दत्तात्रय भिलारे, नारायण फुले, विजयराव दोशी उपस्थित होते.