शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 8:05 AM

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, जगासाठी धाेकादायक ठरलेली दहशतवादी संघटना अल-कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र,  अल-कायदा भारत आणि काश्मीरकडे पुन्हा लक्ष केंद्रित करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. अल-कायदाची भारतीय उपखंडातील संघटना ‘क्यूआयएस’ने आपल्या ‘नवा-ए-अफगाण जिहाद’ या मासिकाचे नाव बदलून ‘नवा-ए-गजवाह-ए हिंद’ असे ठेवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अल-कायदाकडे सध्या एक कमकुवत संघटना म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, आता संघटनेला बळकटी मिळू लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.

अमली पदार्थांची तस्करी वाढलीतालिबाननी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून माेठ्या प्रमाणावर हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. २०२१ च्या उत्तरार्धानंतर तस्करी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये फार माेठ्या प्रमाणावर हेराॅईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे त्याचेच सूचक आहे.

अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनकअल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना २०२३पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान