बीजिंग : २०२७ सालापर्यंत चीनचे लष्कर मानवरहित शस्त्रास्त्रे व आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित यंत्रणेने सुसज्ज होणार आहेत. जगातील इतर देशांशी इलेक्ट्रॉनिक, सायबर, अंतराळ, मानसशास्त्रीय अशा सर्व स्तरांवर लढता यावे, यासाठी चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) केंद्रीय समितीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका, युरोपातील देशांशी मुकाबला करायचा असेल तर त्यासाठी आपले लष्कर जागतिक दर्जाचे हवे, हे चीनने ओळखले आहे. त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत. चीनशी युद्ध करण्यासाठी अमेरिकेने सज्ज राहिले पाहिजे, असे अमेरिकेतील नेते मायकेल मॅककॉल यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)
सायबर युद्धासाठी जोरदार तयारीn चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करताना स्मार्ट टेक्नाॅलॉजी व अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर करण्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भर दिला आहे. यासंदर्भात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ठरविलेल्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. n चीनच्या लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा, संगणकीकरण आदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यात सायबर युद्धासाठी चिनी सैन्याला तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचाही समावेश आहे.
मानवरहित यंत्रणेद्वारे डागली जाणार क्षेपणास्त्रेसैन्यामध्ये रोबोटिक तसेच मानवरहित यंत्रणांवर चालणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. लष्कराला रसद पुरवठा करण्याकरिता मानवरहित वाहने, नौदलासाठी मानवरहित जहाजे, पाणबुड्या यांचा वापर करण्यावर भर देण्याचा विचार आहे. हवाई दलासाठीदेखील मानवरहित यंत्रणा विकसित करत आहे.
खासगी कंपन्यांना मोठी सबसिडीआर्टिफिशियल इंटेलिजन्स व अन्य महत्वाच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी चीन खासगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. हे काम करणाऱ्या शी जिनपिंग सरकारने मोठी सबसिडी देऊ केली आहे. शी जिनपिंग सर्वात अप्रिय नेताजगात शी जिनपिंग हे सर्वात अप्रिय नेता आहेत, असे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. जिनपिंग यांच्याविषयी वाईट मतेच ऐकायला मिळाली, असे पॉम्पिओ यांनी पुस्तकात म्हटले आहे.