शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

चिंताजनक! बेरोजगारांना हार्ट अटॅकचा धोका; दशकात १५ टक्के लोक होणार ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:21 AM

संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेत बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील १० वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे. 

हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ  मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

४.५% बेरोजगारांमध्ये धोका गंभीरअभ्यासात या आजारांचे पुढील १० वर्षांत अतिशय कमी, मध्यम आणि उच्च जोखमीचे प्रमाण अनुक्रमे ८४.९, १४.४, ०.७ टक्के असल्याचे आढळून आले. यामध्ये ३४८ बेरोजगारांचा समावेश होता. त्यातील ४.५ टक्के लोकांना पुढील १० वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले, तर सुमारे १२ टक्के काम करणाऱ्या लोकांना मध्यम धोका असल्याचे आढळून आले.

नेमका कुणा-कुणाला आहे हा धोका?बेंगळूरू स्थित आयसीएमआरचे डॉ. प्रशांत माथूर यांनी सांगितले की, उच्च जोखीम असलेल्या लोकांची लवकर ओळख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासात ४,४८० लोकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यात ५०% ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ज्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहते, त्यातील जवळपास २५% लोकांना हृदय, रक्तवाहिन्यांचा आजार होण्याचा धोका असतो. १८% लठ्ठ लोकांनाही हा धोका असतो.

शहरी लोकांवर संकट?अभ्यासात, संशोधकांनी शहरी विरुद्ध ग्रामीण लोकसंख्येच्या आधारावर पुढील १० वर्षांमध्ये हृदयविकाराच्या जोखमीचे ही मूल्यांकन केले आहे.

यानुसार, गंभीर धोका शहरी लोकसंख्येमध्ये सर्वाधिक आहे. सुमारे १७.५ टक्के शहरी लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा मध्यम ते गंभीर धोका असल्याचे आढळून आले, तर ग्रामीण लोकसंख्येच्या १३.८ टक्के लोकांना या आजारांचा धोका आहे. 

खेड्यातील ८६.२ टक्के लोक हृदयाशी संबंधित आजारांच्या जोखमीपासून मुक्त आहेत.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका