नवी दिल्ली : हवाई वाहतुकीसाठी सरकारने नवी ‘स्टँडर्ड आॅपरेटिव्ह प्रोसिजर’ (एसओपी) जारी केली आहे. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय विमानांत आता प्रवाशांना मद्य आणि गरम जेवण दिले जाईल, तसेच देशांतर्गत विमानांत पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि साधी पेये (बेवरेजेस) उपलब्ध करून दिली जातील.
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उशा पाधी यांनी यासंबंधीची सूचना जारी केली आहे. विमानात आता मनोरंजन साधनांनाही परवानगी असेल. खाद्यपदार्थ अथवा पेये वाटप करताना प्रत्येक प्रवाशासाठी नवे हातमोजे विमान कर्मचाऱ्यांना घालावे लागतील. आतापर्यंत देशांतर्गत मार्गांवर खाद्यपदार्थ दिले जात नव्हते. आंतरराष्ट्रीय विमानांत पाकीटबंद पदार्थ प्रवासी बसण्याआधी आसनांवर ठेवले जात होते.आंतरराष्ट्रीय विमानांतील सुविधांत असे होणार बदलआतापर्यंत : उड्डाण कालावधीनुसार, खाद्यपदार्थांना पूर्णत: बंदी अथवा किमान परवानगी होती. चहा-कॉफीला परवानगी नव्हती. पाकीटबंद पदार्थ प्रवासी विमाात चढण्यापूर्वी आसनांवर ठेवले जात.आता : गरम जेवण आणि मर्यादित स्वरूपात पेये देता येतील. सर्व श्रेणीत ताम्हण आणि ताट-वाट्या विल्हेवाट लावण्याजोग्या (डिस्पोजेबल) असतील. मद्यासह सर्व पेये डिस्पोजेबल कंटेनरमध्ये दिली जातील. वाढप्यांना प्रत्येक वेळी नवे मोजे वापरावे लागतील. विमान कंपन्यांच्या धोरणानुसार मनोरंजन साधनांना परवानगी असेल.आता : विमान कंपन्या प्रवाशांना पाकीटबंद पदार्थ/नाश्ता देऊ शकतील. साधी पेये देऊ शकतील. धोरण आणि उड्डाण कालावधीनुसार या सुविधा मिळतील. सर्व श्रेणीत ताम्हण (ट्रे) आणि ताट-वाट्या विल्हेवाट लावण्याजोग्या (डिस्पोजेबल) असतील. प्रत्येक पदार्थ/पेये वाढताना कर्मचाºयांना नवे मोजे घालावे लागतील. मनोरंजन साधने विमानात चढण्यापूर्वी निर्जंतुक करून घ्यावी लागतील. एकदा वापरून फेकण्याजोगे अथवा निर्जंतुक केलेले ईअरफोन किंवा हेडफोन पुरविले जातील.देशांतर्गत विमानांत असे असतील बदल :आतापर्यंत : खाद्यपदार्थ दिले जात नव्हते. पाण्याच्या बाटल्या गॅलरी एरियात अथवा आसनांवर दिल्या जात होत्या. आरोग्यविषयक गरजेशिवाय कोणत्याही खाद्यपदार्थांचे सेवन वर्ज्य होते.