चेन्नई : लग्नघटिका जवळ आली अन् नवरदेव व त्याचे मित्र नशेत विवाहस्थळी दाखल झाले. हा प्रकार पाहून ती प्रचंड भडकली. हे काय चालू आहे असा सवाल नवरदेवाला केला; पण तरीही नवरदेवाची मग्रुरी कमी झाली नाही. शेवटी संतापलेल्या त्या तरुणीने मंगळसूत्रच नवरदेवाला परत केले. अशा मुलाशी मला लग्नच करायचे नाही अशा स्पष्ट शब्दात तिने ठणकावले. विशेष म्हणजे तरुणीच्या या धाडसानंतर तिला विवाहासाठी शंभरहून अधिक प्रस्ताव आले आहेत.ही घटना आहे चेन्नईची. बोदिनयाकनुर या गावची. प्रिया (२०) आणि इंजिनिअर असलेला चेलीपंदी (२५) हे विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरदेव आणि त्याचे मित्र दारू पिऊन आले. या घटनेनंतर प्रियाने पोलीस स्टेशन गाठले. तेथून ही माहिती एसपी आॅफिसला देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पोलीस निरीक्षक जयाराणी यांना सूचित केले. प्रियाकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक जयाराणी यांनी सांगितले की, प्रिया ही एका गरीब घरातील मुलगी आहे. (वृत्तसंस्था)
मद्यपी नवरदेवाला वधूने लाथाडले..!
By admin | Published: October 24, 2015 2:55 AM