शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मद्यपी कर्मचाऱ्यांची रेल्वे उतरवणार !

By admin | Published: June 11, 2014 10:58 PM

प्रत्येक रेल्वे चालक आणि सहायक चालक दररोज ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी त्यांनी मद्यसेवन केलेले नाही खात्री करण्यासाठी श्वासोच्छ्वास विश्लेषण चाचणी करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : प्रत्येक रेल्वे चालक आणि सहायक चालक दररोज ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी त्यांनी मद्यसेवन केलेले नाही याची खात्री करण्यासाठी त्यांची सक्तीने ‘ब्रीथ अ‍ॅनेलायजर टेस्ट’ (श्वासोच्छ्वास विश्लेषण चाचणी) करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव आहे. तसेच रेल्वेमध्ये सुरक्षिततेशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला दारूचे अथवा अन्य प्रकारे नशा करण्याचे व्यसन आहे,याची माहिती घेऊन त्यांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यासही सर्व वरिष्ठ पर्यवेक्षकांना सांगण्यात येणार आहे.रेल्वे कर्मचाऱ्यांमधील आणि विशेषत: गाड्या चालविणे, स्थानकांचे व्यवस्थापन करणे व गाड्यांमध्ये विविध प्रकारच्या सेवा पुरविणे या कामांशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांमधील मद्यसेवनास आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आखलेल्या नव्या धोरणात या उपायांचा समावेश आहे. प्रशासनाने हे प्रारूप धोरण सर्व संबंधितांची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले असून या विचारविनिमयानंतर ते लागू केले जाणार आहे.ड्यूटीवर रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण ठराविक मर्यादेहून जास्त असल्याचे चाचणीमध्ये आढळून आले, तर कडक कारवाई करण्याचाही यात समावेश आहे. यानुसार कोणीही चालक ड्यूटीवर येईल तेव्हा त्याच्या रक्तात दर १०० मिलिलिटरमागे २० हून अधिक मिलिग्रॅम अल्कोहोल असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले, तर अशा चालकाला तात्काळ सेवेतून काढून टाकण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. चाचणीमध्ये याहून कमी प्रमाणात अल्कोहोल प्रथम आढळून येईल तेव्हा त्याची सर्व्हिस रेकॉर्डमध्ये नोंद करून अशा चालकाला गाडी चालवू दिली जाईल; मात्र असे दुसऱ्यांदा झाल्यास अशा चालकाच्या नोकरीवरही गदा येईल. ज्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अशी चाचणी करून घेणे सक्तीचे केले जाईल. त्यांनी ती करून घेण्यास नकार दिल्यास त्यांनी मद्यसेवन केले आहे असे मानून त्यांना ड्यूटीवर रुजू होऊ दिले जाणार नाही. तसेच अशा नकाराबद्दल त्यांच्यावर खात्यांतर्गत शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल, असे या नव्या धोरणात नमूद केले गेले आहे.प्रत्येक वरिष्ठ सुपरवायझरने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला दारूचे व्यसन आहे याची माहिती विविध मार्गांनी मिळवून त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी. तसेच प्रशिक्षण काळ सुरू असलेला कर्मचारी व्यसनी आहे, असे आढळून आल्यास त्यास नोकरीत कायम केले जाऊ नये, असेही या धोरणात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)