शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अ‍ॅलर्ट

By admin | Published: October 23, 2015 2:51 AM

आगामी दिवाळी आणि लग्नाचा मोसम पाहता सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला

नवी दिल्ली : आगामी दिवाळी आणि लग्नाचा मोसम पाहता सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सर्व व्यावसायिक पार्सलची कसून तपासणी करणे आणि संशयास्पद हालचाल वाटल्यास संबंधित व्यक्तीची कसून झडती घेण्यास कस्टम्स अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.नोव्हेंबर-फेब्रुवारी या काळात दिवाळी, लग्नाचा मोसम येत आहे. या काळात सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शक्यता ध्यानात घेऊन अधिकाऱ्यांनी विमानतळांवर कठोर नजर ठेवली आहे. त्यात आणखी उपाययोजना आखणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.एका ज्येष्ठ कस्टम्स अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अधिकारी सज्ज आहेत. ही निगराणी आणखी कडक केली जाणार आहे. विशेषत: पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची कसून झडती घेण्यात येत आहे.दिवाळीत सोन्याची विक्री प्रचंड होते. त्यातही धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहक सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. भारतात अमृतसर, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवअनंतपुरम, गोवा, पोर्टब्लेअर आदी १९ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. गेल्या काही दिवसांत देशात आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी वाढली आहे. ११२० कोटी रुपयांचे ४,४८० किलो सोने जप्त २०१४-१५ या वर्षात ३८८ प्रकरणांत २३० लोकांना अटक करण्यात आली. ज्यांच्यापासून १५५ कोटी रुपयांचे ५९६ किलो सोने जप्त करण्यात आले. २०१३-१४ मध्ये सोन्याच्या तस्करीची ३६३ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ९२ कोटी रुपयांचे ३५३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात १२३ जणांना अटक करण्यात आली होती. यंदा एप्रिल ते आॅगस्ट या काळात १६९ प्रकरणी १०० जणांना अटक करून ७६ कोटी रुपयांचे २९३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये देशभरात सोन्याच्या तस्करीची ४४०० प्रकरणे उघडकीस आली. त्यात ११२० कोटी रुपयांचे ४,४८० किलो सोने जप्त करण्यात आले. यासाठी २५२ जणांना अटक करण्यात आली.