नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, चंदिगड, देहराडून, सिमाला विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराची लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत घुसले होते. या विमानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्याने या विमानांनी बॉम्ब पळ काढला. दरम्यान भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे एक एफ-16 विमान लामा व्हॉलीमध्ये पाडल्याचे वृत्त आहे.
उत्तर भारतात अलर्ट! लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोटसह आठ विमानतळ बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 13:49 IST