शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

सर्व एक्झिट पोलचा भाजपाकडे कल! वाचा गुजरात विधानसभेच्या सर्व Exit Poll ची आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 8:12 PM

सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

नवी दिल्ली -  सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र  दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून गुजरातमधील मतदानाचा कल भाजपाच्या दिशेने असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले आहे. नेहमीच धक्कादायक आणि अचूक अंदाज वर्तवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूज 24 टुडेज चाणक्यने भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवली आहे.  इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये 99-113 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68-82 जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलं आहे.  2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 116 आणि काँग्रेसला 60 जागा जिंकण्यात यश आले होते.  टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 109 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच सत्तेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 49 टक्के मतांसह 117 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काँग्रेसला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये केवळ एक जागा जाण्याची शक्यता आहे.    इतर एक्झिट पोलमध्ये सुद्धा असाच कयास वर्तवण्यात आला आहे. या सर्व पोलचा आढावा घेतल्यास भाजपाला साधारणत: 49 टक्के मते आणि 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस