नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या मुकेश कुमार, पवन कुमार गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चारही खुन्यांना उद्या मंगळवारी सकाळी दिली जाणारी फाशी पुन्हा एकदा टळली आहे. याआधीही १ फेब्रुवारी रोजी ठरलेली फाशी थांबविली गेली होती.त्यांची ‘डेथ वॉरन्ट’ ज्यांनी काढली, त्याच अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी, पुढील आदेश होईपर्यंत, त्या ‘डेथ वॉरन्ट’ची अंमलबजावणी न करण्याचा आदेश सोमवारी दिला. चार खुन्यांपैकी पवन कुमार गुप्ताने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याने कोणालाही मंगळवारी फाशी देणे कायद्याला धरून होणार नाही, असे न्यायाधीश म्हणाले. त्यानंतर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला असला तरी फाशी टळली आहे. याआधी फेब्रुवारीत दोघांच्या दयेच्या अर्जामुळे फाशी टळली होती.>अचानक कलाटणीसोमवारी सर्वोच्च न्यायालय व सत्र न्यायालयात घडलेल्या घटनानंतर मंगळवारी फाशी होईल, असे चित्र होते. मात्र पवन कुमारच्या दयेच्या अर्जाने कलाटणी मिळाली व त्याची परिणती अखेर चौघांचीही फाशी स्थगित होण्यात झाली. फाशीला स्थगिती देण्याचा दोन खुन्यांचा आधीचा अर्ज फेटाळल्यानंतर काही तासांतच सत्र न्यायालयास नव्या अर्जावर स्थगिती द्यावी लागली.
‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 6:30 AM