ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. २३ - जर्मनीतील म्युनिच शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ९ निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले असून एका हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं समजत आहे. तीनपैकी एका हल्लेखोराने स्वत:वरच गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान जर्मनीतील सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतल्या भारतीय नागरिकांची माहिती जाणून परराष्ट्र मंत्रालयाने काही हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.
ते पुढीलप्रमाणे : 0171 2885973, 01512 3595006, 0175 4000667
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
दरम्यान जर्मनीतील हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. 'जर्मनीतील हल्ल्याबद्दल ऐकून मोठे दु:ख झाले. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत', अशा शब्दांत ट्विटरवरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
We are appalled by the horrific incident in Munich. Our thoughts & prayers are with the families of the deceased & those injured.— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2016
Safety of Indian nationals may be informed on our Munich helpline numbers: 0171 2885973, 01512 3595006, 0175 4000667: Indian Consulate— ANI (@ANI_news) July 22, 2016
Police chief says Suspect in Munich mall shooting that killed 9 was an 18-year-old whose motive is still 'fully unclear.': AP— ANI (@ANI_news) July 23, 2016
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही म्युनिच हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.
Shocked & saddened by the attack in Munich. Prayers for the families who lost loved ones to this senseless violence— Office of RG (@OfficeOfRG) July 23, 2016