अर्जुन : कृष्णा, सीबीडीटीने २८ मे रोजी नवीन फॉर्म २६ एस संबंधित अधिसूचना जारी केली आहे. तीे काय आहे?कृष्णा : अर्जुना, आताच्या चालू फॉर्म २६ एसमध्ये टीडीएस कपात/टीसीएस जमा केलेला, भरलेला कर, परतावा इत्यादींचा तपशील उपलब्ध आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२० मध्ये नवीन कलम २८४ बीबी नवीन फॉर्म २६ एस लागू करण्यासाठी आणण्यात आले. ज्यामध्ये अधिक माहिती फॉर्म २६ एसमध्ये उपलब्ध होईल. सीबीडीटीने आणलेली अधिसूचना १ जून २०२० पासून लागू होईल.
अर्जुन : कृष्णा, नवीन फॉर्म २६ एसमध्ये कोणती अधिक माहिती दिली जाईल?कृष्ण : अर्जुना, फॉर्म २६ एसचे नाव ‘‘अॅन्युअल टॅक्स स्टेटमेंट’’वरून ‘‘अॅन्युअल इन्फॉमेशन स्टेटमेंट’’ असे करण्यात आले. आधीच्या तपशिलाव्यतिरिक्त यात स्पेसिफाईड व्यवहाराचा तपशील (मालमत्ता आणि शेअर्सच्या व्यवहारांची माहिती इ.) मागणी आणि परताव्याच्या संबंधित माहिती, प्रलंबित आणि पूर्ण झालेल्या कार्यवाहीशी संबंधित माहिती इ. उपलब्ध होईल.
अर्जुन : कृष्णा, २६ एसमध्ये माहिती प्रलंबित कशी होईल?कृष्णा : अर्जुना, आयकर विभाग किंवा अधिकृत व्यक्ती विविध स्रोतांकडून जसे बँक, नोंदणी कार्यालय इत्यादींकडून माहिती प्राप्त करून करदात्यांच्या आयकर वेबसाइटवरील नोंदणीकृत खात्यावर अपलोड करतील. आयकर विभाग त्यांना माहिती प्राप्त झाल्यावर तीन महिन्यांच्या आत माहिती अपलोड करतील.
अर्जुन : कृष्णा, यामधून करदात्याने काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, कर अधिकाऱ्यांना २६ एसमधील माहितीची तुलना करदात्यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या रिटर्नशी सोप्या रीतीने करतायेईल. करदात्यांनी त्यांचे रिटर्न २६ एसमधील माहिती लक्षात घेऊनच भरावे. कोणतीही झालेली चूक विभागातील चौकशीला आमंत्रित करेल.अर्जुन : कृष्णा, वरील बदलांचा काय परिणाम होईल?कृष्ण : अर्जुना, एका जागी माहिती उपलब्ध होण्यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल. यापूर्वी फक्त आयकर अधिकाऱ्यांकडे विशिष्ट व्यवहारांची माहिती होती आणि त्याआधारे नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु आता फॉर्म २६ एसद्वारे कोणतीही चुकीची माहिती नोंदविली असेल तर त्यावर सुधारात्मक कारवाई करण्यास करदाता सक्षम होईल. नवीन फॉर्म २६ एसमुळे सर्वसमावेशक माहिती कर अधिकाºयांकडे असल्याने रिटर्न तसेच ई-अॅसेसमेंट प्रक्रियेत गती येईल.