- महेश खरे सूरत : निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि, काँग्रेस अजुनही त्रस्त आहे. बंडखोरांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसने उशीरा का होईना, वरिष्ठ नेत्यांचा गटच स्थापन केला आहे. हेच नेते प्रचार करण्यासोबत असंतुष्टांची मनधरणीही करीत आहेत.चार बड्या नेत्यांवर जबाबदारीबंडखोर उमेदवारांचे मन वळवून त्यांना मैदानातून माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी काँग्रेसने चार वरिष्ठ नेत्यांवर टाकली. दक्षिण गुजरातसाठी सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद, अहमदाबादसाठी तरुण गोगोई (आसामचे मुख्यमंत्री), सौराष्टÑासाठी गुलाम नबी आझाद तसेच कच्छ आणि उत्तर गुजरातसाठी मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले गट स्थापन करण्यात आले आहेत.महुआमधील स्थितीने चिंतामाजी केंद्रीय मंत्री आणि महुआ मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार चौधरी यांच्याविरुद्ध सुरेश चौधरी यांनी मैदानात उडी घेतली आहे. तुषार हे बाहेरचे म्हणून त्यांच्याविरुद्ध असंतोष व्यक्त होत आहे. अशात सुरेश चौधरी हे आखाड्यात मांड ठोकून असल्याचे काँग्रेसची चिंता वाढली आहे.पटेल यांची डोकेदुखीकरंज विधानसभा मतदार संघातून भीमजी पटेल हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सूरत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहिलेले भीमजी पटेल या भागात लोकप्रिय आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने भाजपची मते घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 2:06 AM