कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहेत. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांची पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या म्हणाल्या, 'सर्व पक्ष भाजपासारखे नसतात. माझा पक्ष खूप गरीब आहे. त्यामुळे मी निवडणूक प्रक्रिया सुधारण्याविषयी बोलते.'
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नजरुल मंचवरुन सर्वात मोठे निवडणूक कॅम्पेन सुरु केले. या कॅम्पेनचे उद्दिष्ट्य 2021 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका असल्याचे दिसून येते. या कॅम्पेनच्या माध्यमातून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच, ममता बॅनर्जी यांनी या कॅम्पेनदरम्यान एक मोबाइल नंबर (9137091370) आणि वेबसाइट(didikebolo.com ) लाँच केली.
पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, कॅम्पेनवेळी लाँच करण्यात आलेल्या मोबाइल नंबर आणि वेबसाइटच्या माध्यमातून जनता आपल्या समस्या किंवा सूचना देऊ शकतात. तसेच, येत्या शंभर दिवसात पार्टीचे एक हजारहून अधिक कार्यकर्ते गावा-गावात जाऊन जनतेशी चर्चा करण्यात आहेत. तसेच, कार्यकर्ते जनतेची मते जाणून घेणार आहेत. कोण कार्यकर्ता, कोणत्या गावात, कधी जाणार याबाबत पार्टी निर्णय घेणार आहे.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. या निवडणुकीत पश्चिच बंगालचा गड असलेल्या तृणमूल काँग्रेस पार्टीला भाजपाने सुरुंग लावला. तेव्हापासून ममता बॅनर्जी भाजपावर टीका करताना दिसतात.