नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे १० डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात कामकाज विनाअडथळा पार पडावे, यासाठी यात चर्चा करण्यात येईल.नायडू यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, वित्तमंत्री अरुण जेटलींसह विविध नेते उपस्थित राहतील. लोकसभा निवडणूक होण्याआधीचे हे अखेरचे अधिवेशन आहे.
१० डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 6:20 AM