नवी दिल्ली : अठरा नोव्हेंबरपासून सुरू होत असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच १६ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालेल.लोकसभा सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होईल. अधिवेशन सुरळीत चालविण्यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला विविध पक्षांच्या नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतील.केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हेही १७ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. कंपनी कर कपात, ई-सिगारेट्स आणि ई-हुक्कासंबंधीचे जारी करण्यात आलेल्या वटहुकुमाची जागा घेणारे विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष आर्थिक मंदी आणि बेरोजगारीसह अन्य मुद्यांवर सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्ष घेणार आज सर्वपक्षीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 5:15 AM