बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:02 PM2024-08-06T12:02:03+5:302024-08-06T12:02:47+5:30

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली.

all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament- | बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

S Jaishankar briefs MPs on Bangladesh :बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशच्या संकटावर भारताचं बारीक लक्ष आहे. बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. 

बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश - जयशंकर 
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. जयशंकर  म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले आहेत. शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या आहेत. त्या येथून ब्रिटन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात.

बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
बांगलादेशात मार्शल लॉ लागू झाला, तर भारत त्याचा सामना कसा करणार? बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? चीन आणि पाकिस्तानची भूमिका काय असेल? याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे राजकीय पक्षांना माहिती देऊ शकतात.

परराष्ट्र मंत्री संसदेत उत्तर देतील
बांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात संसदेत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मोदी सरकारला सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचे आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील परिस्थितीचा दिला.

राहुल गांधींनी बैठकीत विचारले 'हे' सवाल
बांगलादेशातील परिस्थितीमध्ये परकीय हात आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी बैठकीत केला. या परिस्थितीबाबत भारताकडे काही दीर्घकालीन योजना आहे का? बांगलादेशच्या नव्या सरकारबाबत भारताचा अॅक्शन प्लॅन काय असेल? बैठकीत इतर पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.

काल रात्री मोदींसोबत बैठक
सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS)  बैठक झाली. बांगलादेशातील सत्तापालटाचा भारतावर काय परिणाम होईल? या विषयावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होत्या.

Web Title: all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.