शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
5
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
6
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
7
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
8
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
9
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
10
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
11
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
12
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
13
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
14
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
15
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
16
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
17
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
19
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

लव्ह जिहाद प्रकरणात जोधा-अकबरची एंट्री; लग्नासाठी धर्मांतराची गरज नाही-हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 6:12 PM

Allahabad High Court on Love Jihad: लव जिहादसंबंधी एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टने अकबर आणि जोधाबाई यांचे उदाहरण दिले.

ठळक मुद्दे'फक्त लग्न करण्यासाठी बळजबरीने धर्णांतर करणे अयोग्य'

अलाबाबाद: उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणात आता मुघल सम्राट अकबर आणि त्यांची हिंदू पत्नी जोधाबाई यांची एंट्री झाली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयादरम्यान या दोघांची एंट्री झाली. हायकोर्टात एटा जिल्ह्यातील लग्नासाठी बळजबरीने धर्मांतर केल्याप्रकरणाची सुनावणी सुरू होती. या खटल्याचा निर्णय देताना अकबर आणि जोधाबाई यांच्या नात्याला उदाहरण म्हणून सादर करण्यात आले.

कोर्टाने म्हटले की, फक्त लग्न करण्यासाठी बळजबरीने धर्णांतर करणे अयोग्य आहे. अशा धर्मांतमध्ये पुजा करण्याची पद्धत बदलते, पण मनात त्या धर्मातील देवाबद्दल आस्था निर्माण होत नाही. अशा धर्मांतरामुळे त्या व्यक्तीसह समाज आणि देशावर वाईट परिणाम पडतो. कोर्टाने आपला निर्णय देताना धर्मांतराला चुकीचे म्हटले असून, लग्न करण्यासाठी धर्मांतर करण्याची गरज नसल्याचं मतही व्यक्त केलंय. 

एटा जिल्ह्यातील जावेदच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की, धर्म आस्थेशी संबंधित विषय आहे. इश्वराबद्दल आस्था असण्यासाठी एखाद्या विशिष्ट धर्माच्या पुजेच्या पद्धतीची गरज नाही. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी एकाच धर्माचे असणे गरजेचे नाही. तसेच, फक्त लग्न करण्यासाठी बळजबरीने धर्म परिवर्तन करणेही चुकीचे आहे. एकमेकांच्या धर्माचा आणि आस्थेचा सन्मान करुनही नाते जपता येतात असे म्हणत कोर्टाने मुघल बादशाह अकबर आणि त्यांची हिंदू पत्नी जोधाबाई यांच्याकडे उदाहरण दिले.

बळजबरी लग्न केल्याचा आरोपजस्टिस शेखर यादव यांनी एटातील रहिवासी जावेदच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी केली. जावेदने एका हिंदू मुलीला आपल्या बोलण्यात अडकवून तिच्याशी लग्न केलं होतं. लग्न झाल्यावर तिचे धर्मांतर केले आणि परत मुस्लिम पद्धतीने तिच्याशी निकाह केला. याप्रकरणी त्या तरुणीने न्यायाधशींसमोर आपली बाजू मांडली आणि बळजबरीने उर्दुमध्ये लिहीलेल्या कागदावर सही करुन घेतल्याचा आरोपही केला. यानंतरर कोर्टाने जावेदचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Jihadलव्ह जिहाद