शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 4:00 PM

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे.

अलाहाबाद - उत्तर प्रदेशची संगम नगरी असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून अलाहाबाद शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल. मात्र, 444 वर्षांपूर्वीही या स्थानकाचे नाव प्रयागराज असेच होते. त्यावेळी, अकबर बादशहाने या स्थानकाचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले. त्यानंतर पुन्हा या अलाहाबादचे नाव प्रयागराज बनले आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे संत समाज आनंदी झाला आहे. पण, विरोधकांनी या नाव बदलाला आपला विरोध दर्शवला होता. इतिहास तज्ञ्ज्ञांच्यामते अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अकबरने सन 1574च्या जवळपास प्रयागराज येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने येथे नवीन नगर बसवले होते. त्याचे नाव अलाहाबाद ठेवण्यात आले. त्यापूर्वी या शहराला प्रयागराज नावानेच ओळखले जात. तसेच मानचरितमानस या ग्रंथातही अलाहाबादचा उल्लेख प्रयागराज असाच आहे. प्राचीन काळात संगम नदीच्या पाण्याने राजे-महाराजांचा येथे अभिषेक करण्यात येत होता. तर, वाल्मिकी 'रामायण'मध्येही याचा उल्लेख आहे. वनवासाला जातेवेळी श्रीराम यांनी प्रयाग येथील ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमाल भेट दिली होती. 

प्रभू श्रीराम जेव्हा श्रृंग्वेरपूर येथे पोहोचले होते, तेव्हा तेथेही प्रयागराज हाच उल्लेख आला होता. सर्वाच प्राचीन आणि सत्यवचन असलेल्या मत्यपुराणच्या 102 ते 107 या अध्यायातही या तिर्थाच्या महात्म्याचा उल्लेख आहे. प्रयाग हे प्रजापतीचे क्षेत्र असून येथे गंगा आणि जमुना या नद्या वाहत असल्याचे या अध्यात सांगतिले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथramayanरामायणUttar Pradeshउत्तर प्रदेश