शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

Sonia Gandhi : आपात्कालीन वापरासाठी इतर लसींना परवानगी द्या, साेनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:51 AM

Sonia Gandhi : साेनिया गांधी यांनी काॅंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाेबत आढावा घेऊन काेराेनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्याचा उल्लेख त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून लसींना लवकर परवानगी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय साेनियांनी आयुष्य वाचविणाऱ्या औषधांवरील ‘जीएसटी’ रद्द करावा तसेच पात्र कुटुंबांच्या खात्यात थेट ट्रान्सफरद्वारे सहा हजार रुपये तत्काळ जमा करावे, या प्रमुख मागण्याही केल्या आहेत.साेनिया गांधी यांनी काॅंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाेबत आढावा घेऊन काेराेनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्याचा उल्लेख त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. 

साेनियांनी लिहिले, की बहुतांश राज्यांमध्ये ३ ते ५ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. त्यामुळे एकीकडे स्थानिक उत्पादन क्षमता वाढविणे आवश्यक असून, इतर लसींच्याही आपात्कालीन वापरास लवकरात लवकर परवानगी द्यावी. साेनिया गांधींनी महाराष्ट्रातील लस उपलब्धतेबाबतही मुद्दा पंतप्रधानांकडे मांडला. लसपुरवठ्याचे धाेरण सरसकट सर्व राज्यांसाठी समान असायला नकाे. लाेकसंख्येनुसार लस पुरवठा व्हावा, असे साेनिया गांधींनी म्हटले आहे. तसेच व्हेंटिलेटर्स, ऑक्सिमीटर्स तसेच ऑक्सिजन सिलिंडरवरही जीएसटी आकारण्यात येऊ नये, असे साेनियांनी म्हटले आहे.

लसी पुरवण्यातील अपयश झाकण्यासाठी  भाषणबाजी -चिदंबरम- केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा आणि वाटप नीटपणे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.  हे अपयश झाकण्यासाठीच सरकार आता पोकळ भाषणबाजी करीत आहे. परंतु अशाने कोरोनाविरोधातील लढाईत यश मिळणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका करताना राज्यसभा खासदार असलेल्या चिदंबरम यांनी अनेक ट्विट पोस्ट केल्या. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी