शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

संजय राऊतांसोबतच AAP च्या सत्येंद्र जैन यांच्यावरही ईडीची कारवाई; कोट्यवधीची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 4:42 PM

ED Action : या प्रकरणात ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यात अकिंचन डेव्हलपर्स (Akinchan Developers) प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स (Indo Metal impex) प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत आपचे नेते सत्येंद्र जैन यांचे कुटुंब आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत ज्यात ईडीने कारवाई केली आहे. यातील एक प्रकरण शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीशी संबंधित आहे, तर दुसरे प्रकरण आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे.पहिले प्रकरण पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. यामध्ये ईडीने 11 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर २ कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नीची आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील किहीम बीचजवळील भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी संजय राऊतचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यालाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले होते. चौकशीत ईडीला मालमत्तेच्या खरेदीत गुन्ह्याचा मार्ग अवलंबल्याचे आढळून आले होते. दुसरे प्रकरण हे आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. यामध्ये ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. असे सांगण्यात आले आहे की, जैन यांच्या कुटुंबातील सदस्य अशा काही फर्मशी संबंधित आहेत, ज्या फर्मची पीएमएलएअंतर्गत चौकशी सुरू आहे.या प्रकरणात ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यात अकिंचन डेव्हलपर्स (Akinchan Developers) प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स (Indo Metal impex) प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत म्हणाले - असत्यमेव जयतेसंजय राऊत यांनीही ईडीच्या कारवाईनंतर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'असत्यमेव जयते!!' त्याचवेळी यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वक्तव्यही केली आहेत. संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना ५५ लाखांचा धनादेश परत केल्याचे ईडीला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण आता तुरुंगात आहे, संजय राऊत त्याचे बिझनेस पार्टनर होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी मी ईडीकडे केली होती.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAAPआपSanjay Rautसंजय राऊत