नवी दिल्ली : देशाची एकात्मता अखंड राहावी यासाठी अंतर्गत व सीमेपलीकडून संभवणाऱ्या धोक्यांचा मुकाबला करून सुरक्षितता अबाधित राहील याची खात्री करण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशभरातील राज्यपाल व नायब राज्यपालांना केले.दिल्लीतून सर्व राज्यपालांशी नववर्षानिमित्त ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने संवाद साधताना, राज्यघटनेची जपणूक आणि पालन करणे व लोकांच्या कल्याणासाठी झटण्याची आपण शपथ घेतली आहे, याचे राष्ट्रपतींनी राज्यपालांना स्मरण दिले. आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडताना राज्यपालांनी नेहमी देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीची जपणूक होईल आ़णि समाजाच्या सर्व वर्गांमध्ये सहिष्णुता व सामंजस्य वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. शांतता व सामाजिक सलोख्याविषयी नेहमीच सजग राहायला हवे, असेही ते म्हणाले.या ‘व्हिडिओ संवादा’त महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी, राज्यपाल म्हणून, त्यांनी खास पुढाकार घेऊन काय कामे केली याचा संक्षिप्त आढावा राष्ट्रपतींना सादर केला. त्याचा गोषवारा असा-च्राज्यातील आदिवासी भागांमधील विशेष परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करून ते ‘पेसा’नुरूप करण्यात आले. त्यानुसार बांबू, तेंदूसह सर्व गौण वनसंपत्तीची मालकी ग्रामसभांना देण्यात आली आहे.च्आदिवासी उपयोजनांपैकी ५ टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला गेला. ‘पेसा’ कायद्याची सर्वांगीण अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. च्मात्र वनहक्क कायदा व ‘पेसा’कायदा यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्राने चोख व तत्पर व्यवस्था करणे गरजेचे आहे.
‘देशाची एकात्मतेसाठी सदैव तत्पर राहावे’
By admin | Published: January 11, 2015 12:31 AM