नवज्योत सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अमरिंदर सिंग यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:19 AM2021-07-03T06:19:38+5:302021-07-03T06:20:15+5:30

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो

Amarinder Singh opposes giving state president post to Navjot Sidhu | नवज्योत सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अमरिंदर सिंग यांचा विरोध

नवज्योत सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अमरिंदर सिंग यांचा विरोध

Next
ठळक मुद्देराज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. राज्यात निवडणूक होणार असल्यामुळे सिद्धू हे मला, पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना मान्य नाहीत, असे सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे समजते.

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो आणि राज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील आजच्या परिस्थितीचा विचार करता पुढील सरकार शिरोमणी अकाली दलाने स्थापन केल्यास कोणाला धक्का बसण्याचे कारण नाही, अशा काळजीत काँग्रेसजन आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, “कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सरकार आधीच मतदारांच्या नाराजीला तोंड देत आहे आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना किमान दीड वर्षांपूर्वी पदावरून दूर करायला हवे होते.

फसल ये काट रहे है
n“हमने जमीन बनाई और ये फसल काट रहे है” असे या निंदकांचे म्हणणे आहे. अमरिंदर सिंग यांच्या विरोधकांचे म्हणणे असे की, “अमरिंदर सिंग यांना पक्षाने निवडणूक जिंकली तर आपण मुख्यमंत्री बनणार नाही हे माहीत असल्यामुळे ते काँग्रेसचा निवडणुकीत पराभव निश्चित करतील.” 
nनवज्योत सिंग सिद्धू यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केले जावे, असे आम्ही केंद्रीय नेतृत्वाला आधीच सांगितले आहे आणि ते पुरेसे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Amarinder Singh opposes giving state president post to Navjot Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.