शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

अमरनाथ यात्रा हल्ला; बसचालक सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर

By admin | Published: July 11, 2017 5:08 PM

सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी जम्मू-काश्मीर सरकारने त्याला 3 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 11- सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार केला गेला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी जम्मू-काश्मीर सरकारने त्याला 3 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच बसमधील ५० अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या ड्रायव्हरची शौर्यपदकासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितलं आहे.  सलीम शेख हे गुजरातमधील वलसाडचे रहिवाशी आहेत.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
 
"गोळीबार सुरू असताना बस चालवणं सुरू ठेवण्याची हिंमत मला देवानेच दिली. म्हणूनच मी थांबलो नाही. गोळीबार सुरूच होता म्हणूनच मी थांबलो नाही", असं बस चालक सलीमने सांगितलं होतं. तसंच "रात्री 9 वाजता आम्हाला सलीमने फोन करून गोळीबाराची माहिती दिली होती. गोळीबारात सात जणांना सलीम वाचवू शकले नाहीत पण पन्नासपेक्षा जास्त यात्रेकरूंना त्यांनी सुरक्षीत ठिकाणी पोहचवलं, याचा आम्हाला गर्व आहे, अशी प्रतिक्रिया सलीमचे नातेवाईक जावेद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.  
आणखी वाचा
अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश
 
नियमांचं उल्लंघन
 यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.